नागरिकांच्या लसीकरणाबरोबरच सुरु आहे पशुधनाचे लसीकरण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर नागरिकांचे लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. यातच नागरिकांचा जीव जसा महत्वाचा आहे, त्याचबरोबर पशु पक्ष्यांचा देखील जीव महत्वाचा आहे.

याच अनुषंगाने जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात कोरोना काळातही पशुधनाचे लसीकरण सुरूच आहे. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पशुधनासाठी लसीकरण केले जाते. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन पशुधनाची संख्या लक्षात घेऊन लसीकरण मोहीम राबवली जाते.

एफएमडी, घटसर्प, फऱ्या, लाळखुरकत अत्रविशर आदी लसीकरण करण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी आवश्यक असणाऱ्या लस पुढील काही दिवसात पशुवैद्यकीय विभागाला प्राप्त होतील. त्यानंतर लसीकरण होणार आहे.

शेवगाव तालुक्यात जवळपास २०१२ सालच्या गणनेनुसार १ लाख ६४ हजार १९५ इतकी पशुधनाची संख्या आहे. यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, बैल, घोडे आदींचा समावेश आहे. पशुधनासाठी आवश्यक असलेल्या एफएमडी, घटसर्प, फऱ्या, लाळ्याखुरकत आदी लसीकरणाची मोहीम नियमितपणे राबविली जात आहे.

तसेच ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा नियमितपणे पुरवल्या जात आहेत. शेवगाव, बोधेगाव, ढोरजळगाव, जोहरापूर, दहिगावने, शहरटाकळी, सामनगाव, घोटण, भातकुडगाव, अमरापूर, आखेगाव, दहिफळ,

चापडगाव, लाडजळगाव, बालमटाकळी, मुंगी, आदी भागात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात सेवा दिली जात आहे. दरम्यान काही ठिकाणी घरपोच पशुवैद्यकीय सेवा पुरवली जात असल्याचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी सी. आर. असलकर यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe