अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना लसीकरण बंधनकारकच असणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होत असल्याने पुहा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.

यातच केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि व्यावसायिकांना यामधून सूट देण्यात आली असून नियमांचे पालन करून व्यवसाय ठरून दिलेल्या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.

मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना लसीकरण बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली आहे.

शहरातील अत्यावश्यक सेवा देणार्‍या सर्व संस्था, कार्यालये, हॉटेल, दुकानांसह खासगी आस्थापना, खासगी वाहनचालक व वाहतुकीशी संबंधीत अन्य कर्मचारी, दहावी,

बारावीच्या परीक्षेशी संबंधित शिक्षक, कर्मचारी, बांधकाम कर्मचारी, वृत्तपत्र वितरक, मंगल कार्यालयातील कर्मचारी, उत्पादन क्षेत्रातील सर्व कर्मचार्‍यांना करोना लसीकरण करण्याचे बंधनकारक केले आहे.

लसीकरण न झालेले कामगारांना 15 दिवसांची वैधता असलेले आरटीपीसीआर या करोना चाचणीचे प्रमाणपत्र जवळ बागळणे अनिवार्य आहे.

या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयाची येत्या 10 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe