अहमदनगरमध्ये लस उपलब्ध नाही ! लसीकरण बंद राहणार …

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  अहमदनगर शहरात शुक्रवारी देखील लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी नगर शहरातील लसीकरण बंद आहे.

शहरात पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने कोरोनाचा आकडा वाढतो आहे, त्यामुळे तिसऱ्या लाट येण्याचीही धास्ती आहे.नगर शहरात कोरोना बाधितांची संख्या जुनअखेर कमी झाली.

दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर मनपाचे कोविड केअर सेंटर सॅनिटाईझ करून ठेवण्यात आले. नटराज व जैन पितळे केंद्र उपलब्ध असून तेथेही रूग्ण अत्यल्प आहेत. परंतु, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मनपास्तरावर बैठका घेऊन नियोजन सुरू आहे.

नगर शहरात मागणीपेक्षा कमी लस उपलब्ध होत असल्याने केंद्रांवर गोंधळ होण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच बुधवारपासून लस उपलब्ध झालेली नाही.

मनपाकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारसाठीही लस उपलब्ध झालेली नाही. जिल्हा लसीकरण केंद्राकडून लस न मिळाल्याने शुक्रवारी शहरातील लसीकरण बंद राहणार आहे.

लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये तिव्र नाराजी आहे. शासकीय पातळीवर पाठपुरावा करून लसचा पुरवठा वाढवण्याची मागणी होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe