अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू, वंचित, निराधार, अनाथ यांचेसाठी काम करणार्या सेवाश्रय फाऊंडेशनच्यावतीने
पाथर्डी शहरातील पाच शैक्षणिक संस्थांमध्ये वट वृक्षाचे रोपन करुन अनोखी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
याप्रसंगी सेवाश्रय फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.अनुराधा फुंदे यांनी व्यक्त केले. प्रसंगी बाबुजी आव्हाड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभयराव आव्हाड, प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, डॉ. सुभाष शेकडे, डॉ.बबन चौरे,
दादा वाघ, पालवे मॅडम, ढाकणे मॅडम, सेवाश्रयचे संस्थापक पोपटराव फुंदे यासह प्राध्यापक वृंद उपस्थित होते. याप्रसंगी सौ.अनुराधा फुंदे म्हणाल्या,
वटपौर्णिमेला वटवृक्षाच पूजन करण्यासोबतच ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणार्या वटवृक्षाच जास्तीत जास्त वृक्षारोपन होण आज काळाची गरज बनली आहे.
कष्ट मेहनतीने ग्रामिण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणार्या थोर व्यक्तीमत्वाच स्मरण करत स्व.बाबूजी आव्हाड महाविद्यालय, वसंतदादा विद्यालय, एम एम निर्हाळी विद्यालय, न्यू भगवान महाविद्यालय,
आदर्श विद्यालय आदि संस्थेत आज वटवृक्षांचे रोपन करत श्रध्देसोबत वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगत पर्यावरण निसर्ग संवर्धन करणारी अनोखी वटपौर्णिमा साजरी केल्याचे मोठ समाधान वाटत आहे, असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अभय आव्हाड म्हणाले, आपले सण-समारंभ हे निसर्गाशी सुसंगत आहेत. निसर्ग देवतेची पूजा करण्याचा तो प्रयत्न असतो. निसर्ग हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या निसर्गाचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.
सेवाश्रय फौंडेशनचे पोपटराव व सौ.अनुराधा फुंदे हे नेहमीच वंचित घटकांसाठी काम करत असतात. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमही राबवतात.
वटपौर्णिमेनिमित्त वट वृक्षारोपणाचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असून, या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी आम्ही घेतो असे सांगितले. प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे यांनी वृट पौर्णिमा व वृक्षांचे महत्व सांगून सर्वांचे आभार मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम