अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहरात आता वाहनांना काही काळ बंदी घालण्यात आली आहे. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत रात्री 12 ते सकाळी सहा यावेळेत सर्व वाहनांना नगर शहरात प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
अवजड वाहतूक शहरातून जाऊ नये म्हणून हॉटेल यश पॅलेस, कोठी चौक, नेप्तीनाका येथे दिल्ली गेटकडे येणारे रोडवर व पत्रकार चौक येथे अप्पू हत्ती चौकाकडे जाणारे रोडवर फक्त दुचाकी व हलकी वाहने जातील इतक्या उंचीचे हाईट बॅरीअर बसविण्यात येणार आहेत.
नगर शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डापुलाचे काम प्रगतीपथावर असून त्या अनुषंगाने सक्कर चौक ते चांदणी चौका दरम्यान लाँचिंग गर्डरचे काम करायचे आहे. उड्डाणपुलाच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय झाला होता.
हे काम चालू असताना अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंद करून मार्गात बदल करण्यात येणार आहे. नगरकडून पुण्याकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक शेंडी बायपास शासकीय दूध डेअरी चौक -विळद बायपास – निंबळक बायपास -कांदा मार्केट रोड -केडगाव बायपास मार्गे वळविण्यात येणार आहेत.
पुण्याकडून मनमाड, औरंगाबादकडे जाणारी वाहतूक केडगाव बायपास – निंबळक-विळद-शासकिय दूध डेअरी चौक-शेंडी बायपासमार्गे वळविण्यात येणार आहे. बीड, जामखेड, पाथर्डीकडे जाणारे-येणारी अवजड वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे..
पुण्याकडून येणार्या वाहनांकरिता केडगाव बायपास-अरणगाव-वाळुंज-मुठ्ठी चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. पुणे, नगर, औरंगाबाद या मार्गावरील हलक्या वाहनांसाठी मार्ग बदलला आहे.
यामध्ये सक्कर चौक-आनंदऋषीजी हॉस्पीटल-महात्मा फुले चौक-कोठी आणि सक्कर चौक येथून टिळक रोड-आयुर्वेद कॉलेज कॉर्नर-नेप्ती नाका-दिल्लीगेट-अप्पू हत्ती चौक-पत्रकार चौक-एसपीओ चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम