जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात म्युकर मायकोसिस रुग्णांचा बळी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात करोना पाठोपाठ म्युकर मायकोसिस बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान नुकतेच श्रीरामपूर पाठोपाठ आता नेवासा तालुक्यातील सोनईमध्ये या आजराचा पहिला बळी गेला आहे. सोनई परिसरातील सहा रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

सात दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचे पुणे येथे निधन झाले असून दोघांची प्रकृती सुधारत आहे. एका रुग्णाचा धोका टळला आहे.

एक रुग्ण उपचार घेऊन घरी आलेला असून एका रुग्णाचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची माहिती मिळते आहे. म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना एम्फोटोरीसीन बी या इंजेक्शनद्वारे उपचार दिले जात आहेत.

मात्र रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत आहे. सामान्य रुग्णांना उपचाराचा खर्च परवडत नसल्याने

शासनाने महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचारासाठी मंजुरी दिली असली तरीही काही खाजगी रुग्णालयात या योजनेतून उपचार मिळत नसल्याचे समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe