अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे दरदिवशी अनेकांचे प्राण जात आहे. यातच जिल्ह्यातील तीन मंत्री सरकारमध्ये आहेत.
परंतु एकानेही कोव्हीड रुग्णालय उभे केले नाही. त्यामुळेच सामान्य रुग्णालयांच्या भरवशावरच राहावे लागत आहे.
दरम्यान जिल्ह्यातील कोव्हीड रुग्णांच्या वाढत्या संख्येला आणि मृत्यूला केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असून जिल्हा संकटात असताना पालकमंत्री सुध्दा पाहुण्यासारखे येतात.असा खोचक टोला भाजपाचे जेष्ठनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.
विखे पाटील म्हणाले की, मंत्र्यांना सध्या फक्त केंद्र सरकारवर टिका करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
केंद्राकडे बोट दाखविण्यापेक्षा रेमडीसिविर आणि ऑक्सीजनची उपलब्धता करा, प्रत्येक मंत्र्याला आपल्या मतदार संघात,
जिल्ह्यात 200 बेडचे कोव्हीड रुग्णालय उभारायला सांगा, केवळ फेसबुकवर संवाद साधुन जनतेचे समाधान तुम्ही करु शकणार नाही असा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात व्हॅक्सीनचा पुरवठा केला.
पण त्याचे नियोजन राज्य सरकार व्यवस्थित करु शकले नाही. केवळ आपले अपयश झाकण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी व्हॅक्सीनच्या विषयाला राजकीय वळन देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडुन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|