अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-लोणी बुद्रूक येथे ६० कुटुंबियांना त्यांचे वास्तव्य असलेल्या जागेवरच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी योजनेच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमीनी घरकुल उभारणीसाठी उपयोगात आणल्या तर वंचित कुटुंबियांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल याबाबत शासनाने धोरण घेण्याची गरज असल्याचे मत विखे पाटील यानी व्यक्त केले.
लोणी बुद्रूक येथे ६० कुटुंबियांना त्यांचे वास्तव्य असलेल्या जागेवरच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी योजनेच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देण्यात आली. सिंधूताई आदिवासी निवारा या गृहप्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आ.विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपन्न झाला.
जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,
माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्यासह अनेक पदधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात रहिवाशांना घराच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम