अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ५ ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर शुक्रवार 9 जुलै रोजी पोलिसांनी संयुक्त छापा टाकत दारू अड्डे उद्ध्वस्त केले असून एकूण 1,82,950 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके ,राज्य उत्पादन शुल्क विभाग व राहुरी पोलिस यांच्या संयुक्त पथकाने हि धडक कारवाई केली आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील कच्चे रसायन, 6240 लिटर ,तयार गावठी हातभट्टी दारू 118 लिटर व तसेच 200 किलो नवसागर असा एकूण 1,82,950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला,
त्यानुसार आशाबाई बाळासाहेब गायकवाड,मयूर अनिल गायकवाड,सतिश वसंत गायकवाड , बापू भास्कर गायकवाड ,मंगल बापू गायकवाड आणि एक अज्ञाताविरोधात भादंवि कलम 328,
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(फ) नुसार पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीनुसार राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,
अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, गणेश पाटील ,पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके,
राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक नितेश शेंडे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह पोलिस अधिकारी व अंमलदार आदींनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम