अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटाकडून सर्रासपणे कुऱ्हाड व लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आलाय.
ही घटना दि. २७ मार्च रोजी घडली. दोन्ही गटातील तीन जणांवर कुऱ्हाडीने वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कविता अनिल बोरूडे (वय २५ वर्षे, राहणार कुरणवाडी) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
दि. २७ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्या घरासमोर असताना आरोपी सुनील मोहन बोरूडे (राहणार गोमाळवाडी, ता. नेवासा) हा तेथे आला व त्यांची सासू विठाबाई यांना ‘तुझा मुलगा अनिल व सून कविता यांना घेऊन भाचीच्या लग्नाला का गेली होती’,
असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी आरडाओरड ऐकून कविताचा पती अनिल तेथे आला. तू माझी पत्नी व आईला धक्काबूक्की, शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली असता त्याचा राग आल्याने आरोपी सुनील बोरूडे याने अनिलच्या डोक्यात कुऱ्हाड मारून गंभीर जखमी केले.
यावेळी भांडण सोडविण्यासाठी राजू बोरूडे आला असता त्यालाही काठीने मारहाण करण्यात आली. या फिर्यादीवरून सुनील मोहन बोरूडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद मोहन भागवत बोरूडे (वय ६० वर्षे, राहणार कुरणवाडी, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
दि. २७ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मोहन बोरूडे हे त्यांच्या घरासमोर असताना आरोपी अनिल मोहन बोरूडे व राजू मोहन बोरूडे (दोघे राहणार कुरणवाडी) तेथे आले.
‘मला खर्चासाठी पैसे द्या’, असे म्हणाला, तेव्हा मुलाने ‘मी देतो, तुम्हीही द्या’, असे म्हटल्याचा राग आल्याने अनिल बोरूडे कुऱ्हाड घेऊन तर राजू बोरूडे लाकडी फळी घेऊन धाऊन आले.
यावेळी फिर्यादी मोहन बोरूडे मध्ये पडले असता अनिल याने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारली आणि राजू याने लाकडी फळीने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|