Vivo Smartphone Offer : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी! सर्वात मोठ्या सवलतीत खरेदी करा Vivo चा ‘हा’ फोन

Ahmednagarlive24 office
Published:
Vivo Smartphone Offer

Vivo Smartphone Offer : जर तुम्ही विवोचा शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आता एक उत्तम संधी आहे. यामुळे तुम्हाला Y56 5G स्मार्टफोन खूप मोठ्या सवलतीत खरेदी करता येईल. Amazon ने अशी ऑफर आणली आहे.

फोनची मूळ किंमत 24,999 रुपये आहे. परंतु तो तुम्ही 24% डिस्काउंट नंतर 18,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच बँक ऑफरमध्ये तुम्हाला या फोनची किंमत आणखी 1,000 रुपयांनी कमी करता येईल. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 17,500 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करता येईल. तसेच Vivo चा हा फोन 921 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येईल.

जाणून घ्या Vivo Y56 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा Vivo Y56 हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सह येतो. तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये 8 GB विस्तारित रॅम पाहायला मिळेल. यासोबत फोनची एकूण रॅम गरज भासली तर ती 16 GB पर्यंत जाते.

प्रोसेसर म्हणून Vivo Y56 या फोनमध्ये MediaTek Dimension 700 चिपसेट दिला आहे. या Vivo फोनचा डिस्प्ले 6.58 इंच असून हा डिस्प्ले फुल एचडी रिझोल्यूशन आणि 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. Vivo Y56 डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 इतका आहे.

Vivo Y56 या फोनच्या मागील पॅनलवर फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा पाहायला मिळेल. तसेच सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी पाहायला मिळेल, जी 18 वॉट चार्जिंगला सपोर्ट करेल.

जोपर्यंत OS चा संबंध आहे, तोपर्यंत हा फोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर काम करतो. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी, यात वाय-फाय आणि ब्लूटूथ 5.1 सह सर्व मानक पर्याय दिले आहेत. आकर्षक डिझाइन असणारा हा फोन ब्लॅक इंजिन आणि ऑरेंज शिमर कलर पर्यायांत तुम्ही खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe