अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- यंदा संगमनेर तालुक्यात पावसाची सरासरी कमी झाल्याने जुलै अखेर १० टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता अवघा एक टँकर सुरू असून, एक गाव व पाच वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असल्याने टँकरची संख्या वाढत चालली होती. गेल्यावर्षी तालुक्यात ९ गावे २८ वाड्यांना १० टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यंदा १० टँकर सुरू होते. पठार भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने बहुतांशी भागात टँकर सुरू होते.
सध्या तालुक्यात पावसाची प्रतीक्षा केली जात असून, पावसाअभावी पिके धोक्यात आली आहे. तर येत्या आता आठ-दहा दिवसांत पाऊस न झाल्यास अनेक भागात दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. झालेल्या पावसाचे पाणी सध्या उपलब्ध असल्याने विहिरींना पाणी आल्याने सध्या काही गावांना पाणी उपलब्ध झाले आहे.
जुलैअखेर तालुक्यातील बहुतांश भागात टँकर कमी झाले आहे. ऑगस्ट महिन्यात पिंपळगाव देपा या गावासह पाच वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरची मागणी कमी झाली असली तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून, पावसाने उघडीप दिल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात काही भागात अधिक तर काही भागात कमी पाऊस झाल्याने पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे. भंडारदरा धरण ८० टक्के भरल्याने आशेचा किरण निर्माण झाला आहे. किमान नदी काठच्या गावांना याचा फायदा होणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम