सावधान : मान्सूनने जोर पकडला, राज्यातील या भागात होणार आहे अतिवृष्टी !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनने चांगला जोर पकडला आहे. सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे १२ ते १५ जुलैदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टी होईल,

तर मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. रविवारी मुंबईसह लगतच्या परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती.

दरम्यान सकाळी कोसळलेल्या पावसाने नंतर मात्र मुंबईत विश्रांती घेतली. हवामानात होत असलेले बदल आणि गारव्यामुळे मुंबईकरांची ऊकाड्यापासून सुटका झाली.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेचं किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल.

तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. १३ जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल.

तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!