नगर जिल्ह्यात चोवीस तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात बुधवारी हलक्या पावसाने हजेरी लावली. शहरात दुपारनंतर हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगल्या पावसामुळे खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत. पुढच्या चोवीस तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.

नगर जिल्ह्यात १ जूनपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली हाेती. जूनच्या पहिल्या अाठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने हलकावणी दिली.

महिनाभर पावसाचा खंड पडल्याने खरीपाच्या काही भागात पेरण्या रखडल्या हाेत्या, तर काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले हाेते.

आता काही भागात पावसाला पुन्हा सुरुवात झाली. जून महिन्यात तालुक्यांमध्ये १४० मिलीमीटर पावसाची नाेंद झाली हाेती. जुलै महिन्यात १३० मिलीमीटर पाऊस झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe