अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- जलसंधारण विभागाच्या झालेल्या खात्यामध्ये साडेसहाशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये या भ्रष्टाचाराची पोलखोल केली व सदर भ्रष्टाचार जनतेसमोर आणला
याची जबाबदारी स्वीकारून जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. ते या खात्याचे निष्क्रिय मंत्री असून
त्यांचे खात्याकडे लक्ष नाही, त्यांच्या मतदारसंघातील जनतेला विविध प्रश्नांसाठी झगडावे लागत आहे.
ते काय राज्याचे प्रश्न सोडविणार, जलसंधारण विभागाकडे मंत्रीमहोदयांच्या दुर्लक्ष आहे.त्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे.
याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम