यंदा जिल्ह्यात पाणीच पाणी…चांगल्या पर्जन्यमानाचा हवामान विभागाचा अंदाज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.

याच वेळी ते म्हणाले कि, या दरम्यान नगर जिल्ह्यात 98 टक्के पावसाची शक्यता आहे. यामुळे यंदाच्या वर्षीही नगर जिल्ह्यात पर्जन्यमानाची चांगली शक्यता आहे. महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.

यंदा जून-जुलैमध्ये पावसात मोठे खंड तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख राहिलेले डॉ. साबळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

साबळे गेल्या 18 वर्षांपासून दरवर्षी राज्यातील मान्सूनचा अंदाज वर्तवतात. त्यांनी सांगितले दरवर्षी जानेवारी ते एप्रिल या काळातील कमाल-किमान तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता,

वार्‍याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी घटकांचे निरीक्षण व नोंदीवरून त्या त्या भागात कसा पाऊस पडेल याचा अंदाज वर्तवला जातो.

त्यानुसार यंदा राज्यात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून गुजरातच्या दिशेने येण्याची शक्यता असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले. राज्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहील. काही ठिकाणी कमी दिवसांत जास्त पाऊस तर काही काळ पावसात खंड असे हवामान राहील.

पेरणी करताना त्या भागात 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर व जमिनीत पुरेसा ओलावा लक्षात घेऊन पेरणी करावी. शक्यतो आंतरपीक पद्धतीला प्राधान्य द्यावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe