अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- राष्ट्रीय महामार्गाचे काम व पालिकेच्या कालबाह्य झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्यांमुळे पाथर्डी शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे.
यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. शहरात सध्या ठिकठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे.
सुमारे बावीस वर्षांपूर्वी शहरात जायकवाडी पाणी योजना कार्यान्वित झाली.त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात नव्हता.
कुठलीही तांत्रिक पूर्तता न करता पाणीपुरवठा विभागाने जलवाहिन्या टाकण्याचे काम केले.त्यानंतर वॉल बसवण्याच्या नावाखाली वारंवार ठिकठिकाणी खोदकाम करून रस्ता पोकळ झाला.
त्यातच राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने कामे करताना वारंवार पाइपलाइन फुटते. कोठून कशी पाइपलाइन गेली आहे याची माहिती सांगणारी पालिकेची यंत्रणा उपस्थित नसते.
शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौकात पाईपलाईन फुटली. रस्त्याला ओढ्याचे रूप येऊन वाहतूक ठप्प झाली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम