Waterfalls In Maharashtra: महाराष्ट्रामध्ये ‘या’ ठिकाणी आहे अजब धबधबा! वाहतो उलट्या दिशेने, पावसाळ्यात दया भेट

Ajay Patil
Published:
kokankada waterfalls

Waterfalls In Maharashtra:- पावसाळा हा ऋतू पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ऋतू समजला जातो व या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. पावसाळ्याने सगळीकडे हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, दऱ्या खोऱ्यातून वाहणाऱ्या नद्या, अवखळपणे वाहणारे धबधबे यांचे विहंगम दृश्य मनाला मोहून टाकणारे असते.

निसर्गाच्या बाबतीत पाहिले तर महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला निसर्गाने भरभरून दिलेले आहे या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे तसेच गडकिल्ले आणि प्रसिद्ध असलेले धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. धबधब्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर महाराष्ट्र मध्ये असा एक धबधबा आहे की त्याचे पाणी थेट वरून खाली न पडता खालून वरच्या दिशेने जाते म्हणजेच ते उलटे वाहते.

या उलट्या वाहणाऱ्या धबधब्याचे नाव आहे कोकणकडा धबधबा होय. याचं धबधब्याला रिवर्स धबधबा असे देखील म्हटले जाते. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी धबधबे आहेत व त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. परंतु कोकणकडा धबधबा हा इतरांपेक्षा वेगळा असल्याकारणाने पावसाळ्याच्या कालावधीत हा धबधबा पाहण्यात व या ठिकाणी मनसोक्त पावसाचा आनंद घेत चिंब भिजण्यात एक वेगळाच आनंद आहे.

 कोकणकडा धबधबा वाहतो खालून वरच्या दिशेने

महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यात दुर्गवाडी कोकणकडा या ठिकाणी कोकणकडा नावाचा धबधबा असून त्याला रिवर्स धबधबा असे देखील म्हटले जाते व या नावाने देखील तो प्रसिद्ध आहे. पुण्याजवळील नाणेघाटामध्ये हा धबधबा वाहताना आपल्याला दिसतो.

जर या पावसाळ्यामध्ये तुमचा देखील कुटुंबांसोबत किंवा मित्रांसोबत एखाद्या धबधब्याला भेट द्यायची इच्छा असेल तर तुम्ही कोकणकडा धबधब्याला भेट देऊ शकतात. या ठिकाणी जाण्यासाठी आधी तुम्हाला जुन्नर ला जावे लागते व त्या ठिकाणाहून एखाद्या खाजगी वाहनातून किंवा जुन्नर बस स्थानकातून बसने देखील तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकतात.

 भारतातील इतर धबधबे

1- चित्रकोट धबधबाहा धबधबा छत्तीसगड राज्यामध्ये असून आज भारताचा नायग्रा फॉल्स म्हणून देखील ओळखले जाते. जर आपण चित्रकोट धबधब्याची उंची पाहिली तर ती साधारणपणे तीनशे मीटर इतकी आहे.

2- शिवनसमुद्र धबधबा हा धबधबा कर्नाटक राज्यामध्ये असून शिवनसमुद्र धबधब्याला भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धबधबा म्हणून देखील ओळखले जाते. हा धबधबा साधारणपणे 850 मीटर मध्ये पसरलेला आहे.

3- अथिरापल्ली धबधबा हा धबधबा केरळ राज्यामध्ये असून या धबधब्याला बाहुबली वॉटर फॉल म्हणून देखील ओळखले जाते. कारण ब्लॉकबस्टर ठरलेला बाहुबली या सिनेमाची शूटिंग या अथिरापल्ली धबधब्यावर झाली होती.

4- दूधसागर धबधबा हा धबधबा गोवा राज्यामध्ये असून भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. भारतातील आश्चर्यकारक धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे. दूध सागर धबधबा हा गोवा राज्यातील मांडवी नदीवर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe