लोकसभेची निवडणूकही सक्षमपणे लढण्यास तयार – आमदार निलेश लंके यांचे मोठे वक्तव्य !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-कारोना काळात लंके यांनी केलेल्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत खा. सुजय विखे यांनी आम्हीही कोरोना काळात काम केले,

मात्र त्याचा व्हिडीओ व्हायरल करून गाजावाजा केला नाही असा टोला आ. लंके यांचे नाव न घेता लगवला होता.

त्यास लंके यांनी प्रत्युत्तर देत खा. विखे यांना चांगलेच फटकारले. आधी पारनेर तालुक्यातील काही नेते मला विरोधक मानून टीका करीत होते.

आता माझ्या कामामुळे जिल्ह्यातील काही जणांना मी विरोधक वाटू लागल्याने तेही टीका करू लागले आहेत. त्यांच्या टीकेकडे मी फारसे लक्ष देत नाही.

मात्र, वेळ आल्यास लोकसभेची निवडणूकही आपण सक्षमपणे लढण्यास तयार आहोत,’ अशा शब्दांत पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार पारनेर तालुक्यातील पळशी येथील एका कार्यक्रमात बोलताना लंके यांनी हे आव्हान दिले.

लंके यांना मिळत असलेले पाठबळ आणि विरोधकांकडून होत असलेली टीका लक्षात घेऊन लंके हे राष्ट्रवादीचे नगर लोकसभा मतदारसंघातील पुढील उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

आता लंके यांनी स्वत:च याला दुजोरा देत आपली तयारी असल्याचेही म्हटले आहे. लंके म्हणाले, ‘माझ्याकडे कोणत्याही संस्था नाहीत. कारखाने नाहीत, हॉस्पिटल नाहीत. माझ्याकडे आहे ती जीवाभावाची माणसे. तशी माणसे मात्र कोणाकडे नाहीत.

त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरीही मी घाबरत नाही. आधी तालुक्यातील काही जण मला स्पर्धक मानून टीका करीत होते.

आता जिल्ह्यातील लोकही स्पर्धक मानू लागले आहेत. त्यामुळे मी डगमगणार नाही. मात्र, वेळ पडली तर लोकसभा निवडणूकही सक्षमपणे लढविण्यास आपण तयार आहोत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe