अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- आपला प्रतिनिधी नसला तर काय भोगावे लागते याची प्रचिती आली आहे. तालुक्याच्या विकासासाठी आपला आमदार असणे गरजेचे आहे. आता विधानसभेची मशाल हाती घ्या आणि आपल्या पाठीवर बसलेल्या बाहेरच्या कोल्ह्यास पाण्यात बुडवा, असे आवाहन माजी आमदार नरेंद्र घुले यांनी केले.
जायकवाडी जलाशयावर आपला अधिकार आहे. धरणात शेवटचा थेंब असेपर्यंत तालुक्यास पाणी कमी पडू देणार नाही. ज्ञानेश्वर कारखाना गळीतात राज्यात तिसऱ्या क्रमांकावर कामगारांच्या अथक परिश्रमामुळेच आलेला आहे.
सहकारी बँकेचे संचालक तथा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदतीचे वाटप घुले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, पडिंत भोसले, बबन भुसारी, युवक जिल्हाध्यक्ष संजय कोळगे, बाजार समिती अध्यक्ष अनिल मडके, कल्याण नेमाने, संजय फडके, मन्सुर फारोकी, राजू दौंड उपस्थित होते.
राजश्री घुले म्हणाल्या कोरोनाची तिसरी लाट उबंरठ्यावर आहे. ही लाट केरळातून येत आहे. ती तिपटीने असेल असे निरिक्षकांचे मत आहे. त्यामुळे रुग्ण वाढणार नाहीत याची काळजी घ्या.
कोरोनात निराधार झालेल्या महिलांना काम देण्याचा ठराव जिल्हा परिषदेत झाला आहे. यातून या महिलांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आहे.” घुले म्हणाले, तोंडाला फडके असल्याने त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत.
जीवनात संघर्ष करा ही स्व. मारुतराव घुले यांची शिकवण असल्याने आपले सामर्थ्य आपणच निर्माण करावे लागणार आहे. आपला भाग मुळा पाण्याने वंचित राहिला,
ताजनापुरची मशिनिरी एजन्सीने उचलून नेली त्यामुळे पाणी मिळत नाही अशी दुरावस्था झाली आहे. जायकवाडी जलाशयावर आपला अधिकार आहे. धरणात शेवटचा थेंब असे पर्यंत तालुक्यास पाणी कमी पडू देणार नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम