अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- पोलिस बतावणी करून दरोडा घालणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. तौफिक सत्तार शेख, साजिद खालिद मलिक उर्फ मनुधून व जावेद मुक्तार कुरेशी (तिघे रा. श्रीरामपूर), आरबाज जाकिर मन्सूर उर्फ पिंजारी व शाम भाऊराव साळुंखे अशा पाचजणांना जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, २७ मे २०२१ रोजी फिर्यादी श्रीधर जंगलू सोनवणे यांना शनि शिंगणापूर फाट्याजवळ अडविण्यात आले. पोलिस असल्याची बतावणी करण्यात आली.
फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यात आली. तसेच फिर्यादीकडील इर्टिगा गाडीत बसून त्याचे अपहरण केले. फिर्यादीच्या गाडी भंगारासह घेवून गेले. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरच्या गुन्ह्याचा तपास वेगाने फिरविण्यात आला. मोक्काच्या गुन्ह्यात जामिनावर मुक्त असलेल्या तौफिक सत्तार शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याने साजिद खालिद मलिक उर्फ मनुधून व जावेद मुक्तार कुरेशी, युसूफ उर्फ सोनू आजम शेख,
शोएब फकिरा कुरेशी यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. तद्नंतर साजिद खालिद मलिक उर्फ मनुधून व जावेद मुक्तार कुरेशी यांना ताब्यात घेण्यात आले. इतर आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम