दिल्लीच्या धर्तीवर नगर शहराचा विकास घडवायचा आहे !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- आम आदमी पार्टीच्या राज्य समितीचा अहमदनगर शहर दौरा नुकताच संपन्न झाला. आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाची तयारी काय आहे, पक्ष कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी राज्य समितीचा दौरा आयोजित करण्यात आल्याची माहिती पक्षाचे संघटक श्री विजय कुंभार यांनी दिली.

यावेळी पक्षाचे महाराष्ट्र सहसंयोजक किशोर मध्यान, महाराष्ट्र संघटक विजय कुंभार,महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे आदींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सचिव धनंजय शिंदे म्हणाले की केंद्रातील भाजपाचे व महाराष्ट्रातील महा विकास आघाडीचे सरकार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यात अयशस्वी झाले आहे.

यावेळी बोलताना विजय कुंभार म्हणाले आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी पक्ष संपूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज अहमदनगर शहरात आज राज्य समितीचा दौरा आयोजित करण्यात आला होता.

अहमदनगर शहरातील कार्यकर्त्यांमध्ये अहमदनगर पालिकेची निवडणूक लढवण्यासाठी खूप उत्साह आहे.त्यांना बळ देण्यासाठी पक्ष सदैव त्यांच्या मागे उभा राहणार आहे,

ज्याप्रमाणे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा विकास केला आहे त्याच धर्तीवर अहमदनगर शहराचा विकास करायचा आहे त्यासाठी आम आदमी पार्टी अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात उमेदवार देणार आहेत.

त्याचप्रमाणे शहरातील सुशिक्षित डॉक्टर,वकील, उद्योजक व तरुणांना पक्षसंघटनेत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यात येणार आहे अशी माहिती पक्षाचे संघटक श्री विजय कुंभार यांनी दिली. यावेळी मेजर भरत खाकाळ यांची कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe