अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- श्रीरामपूर शहरातील रहिवासी बेलापूरचे बेपत्ता झालेले व्यापारी गौतम हिरण यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.
दरम्यान हिरण यांच्या मारेकऱ्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा गौतम हिरण यांच्या नातेवाईकांसह बेलापूर ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनी पवित्रा घेतल्याने परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
मात्र या घटनेतील गुन्हेगार दोन दिवसात निष्पन्न होतील, असे पोलीस उपअधीक्षक राहूल मदने यांनी उपस्थितांना आश्वस्त केल्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर बेलापूर येथे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान बेलापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह रविवारी सकाळी एमआयडीसी परिसरात सापडला होता.
सर्व प्रकारच्या बाबी पूर्ण केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सोमवारी मृतदेह दुपारी चारच्या सुमारास श्रीरामपूर येथील बोरावकेनगर मधील हिरण यांच्या निवासस्थानी आणण्यात आला.
मात्र मारेकरी सापडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईक व ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनी घेतला. पोलिसांनी जलदगतीने तपास केला नाही. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही, या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मारेकऱ्यांबाबत पोलिस गाफील राहिले, मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
अश्या मागण्या यावेळी संतप्त नागरिकांनी केल्या. शेवटी पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी कुटुंबीयांसह काही निवडक लोकांशी चर्चा करून आधीच मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.
आताही उत्तरीय तपासणी होऊन बराच कालावधी उलटल्याने उग्र असह्य वास येत आहे. दोन दिवसांत तपास लावून हिरण कुटुंबीयाना न्याय देऊ, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. गौतम हिरण यांच्यावर बेलापूर येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंकार करण्यात आले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|