अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- मराठा आरक्षण मिळवण्यासाठी काय योगदान आहे शिवसेनेचं? आम्ही आमचं बघून घेऊ संज्या तू पवार साहेबांची भांडी घासत रहा, अशी जोरदार टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाविषयी ऐतिहासिक निकाल दिला. यात न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द करण्याचा निकाल दिला आहे. यावरून महाराष्ट्रात राजकारण रंगू लागलं आहे. विरोधीपक्ष ठाकरे सरकारवर हलगर्जीपणाचा आरोप करत आहे.
याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं होतं. त्यावर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.
राणे म्हणाले, संजय राऊतला काय अधिकार मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा? ज्या माणसाने मराठा समाजाची खिल्ली उडवली आणि आजपर्यंत माफी मागितली नाही तो माणूस मराठा आरक्षणाबद्दल बोलतोय.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत पण मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही याकरिता अनेक वेळा त्यांची भूमिका जाणवली. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले.
अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत, असेही राणे यापूर्वी म्हणाले होते. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना असेल तर मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून पंतप्रधानांची वेळ मागणाऱ्या छत्रपती संभाजी राजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही?
असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आमच्यासोबत यावं आणि त्यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|