अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो, पण भाजपाला अजिबात नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात आलं आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, अजिबात नाही.
भाजपाला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच हे सरकार स्थापन करण्यात आलं होतं. त्यांना राज्यात सर्व गोंधळ घातला होता.
आमचं उद्दिष्ट अद्यापही तेच आहे. काँग्रेस काही जिल्ह्यांमध्ये इतकी मजबूत नसून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे,असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असावा असं तुम्ही म्हटलं आहे
असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, काँग्रेस महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे. जर काँग्रसेची पहिल्या क्रमांकावर येण्याची इच्छा असेल तर त्यात चुकीचं काय?. जर आमच्या आमदारांची संख्या जास्त असेल तर आमचा मुख्यमंत्री होईल.
आतापर्यंत अशीच पद्धत राहिली आहे. शिवसेनेसोबत असणाऱ्या वैचारिक मतभेदासंबंधी बोलताना ते म्हणाले की, तुम्ही त्याकडे हवं तसं पाहू शकता. पण हे सरकार एका विशिष्ट ध्येयाने तयार करण्यात आलं आहे.
दरम्यान, शरद पवार भाजपाविरोधात महाआघाडीची चाचपणी करत असून त्यात काँग्रेसची काही भूमिका आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, शरद पवार यांनी काही विरोधकांची बैठक बोलावली आहे.
ते स्वागतार्ह आहे. अशा सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. यासाठी कोणती यंत्रणा तयार करण्यात आली आहे हे वेळेसोबत कळेल. जर शरद पवार भाजपाशी लढत असतील तर स्वागत आहे.
आम्हाला त्याची चिंता का असावी? राहुल गांधी शिवसेनेपासून सावध भूमिका घेतात का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी, हे खरं नसून दिल्लीत युती झाल्याची माहिती दिली. शिवसेनेच्या पार्श्वभूमीमुळे थोडीशी भीती होती, पण आम्ही राष्ट्रीय नेतृत्वाला संमत केलं.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम