हवामान अपडेट्स : जाणून घ्या पुढील तीन दिवसांतील पावसाचा अंदाज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागाच्यावतीनं 19 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

तर, 19 ऑगस्टला कोणताही ॲलर्ट देण्यात आलेला नाही.हवामान विभागानं आजच्या दिवसासाठी कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, मुंबई, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. 16 ऑगस्टची पावसाची स्थिती पुढीलप्रमाणे असेल – सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

तर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 17 ऑगस्टची पावसाची स्थिती पुढीलप्रमाणे असेल – या दिवशी हवामान विभागानं राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. 18 ऑगस्टची पावसाची स्थिती पुढीलप्रमाणे असेल

– या दिवशी सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, रायगड, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe