बसला ओव्हरटेक करायला गेला अन् जीव गमावून बसला!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- भरधाव वेगाने जाणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या शिवशाही बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात तोल सुटून बसवर आदळून झालेल्या या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर दोनजण जखमी झाले आहेत.

ही घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात   घडली. याबाबत सविस्तर असे की, शिवशाही बस (क्र.एमएच १४ जीयू ०६४२) ही नाशिक -पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती.

ही बस घारगावजवळील हॉटेल लक्ष्मी परिसरात आली असता या बसवर मोटारसायकल (क्र.एमएच १७ बीए ४०८६) आदळली. या मोटारसायकलवरुन तीनजन बसुन घारगावकडून कुरकुटवाडीकडे जात होते.

या अपघातात मोटारसायकलचालक तान्हाजी देवराम पवार (वय ४०, रा.कुरकुटवाडी, ता.संगमनेर) हा जागीच ठार झाला. तर सुरेश मोहन पवार (वय २८, रा. कुरकुटवाडी) संतोष दादाभाऊ माळी (वय ३८) यालाही मार लागला असून पैकी सुरेश हा गंभीर जखमी आहे.

या अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, हेड कॉन्स्टेबल दिवटे, पोलीस नाईक रमेश शिंदे, मनेश शिंदे, गिरी, बर्डे, सोनवणे हे घटनास्थळी पोहोचले. जखमींना त्वरीत रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe