जरे हत्याकांड ! बोठेला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणार्‍या बाळ बोठे याला पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून ताब्यात घेतले.

रविवारी त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जिल्ह्यातील बहुचर्चित जरे हत्याकांड मधील मुख्य सूत्रधार बोठे याला नगर पोलिसांनी हैदराबाद येथून काल (शनिवारी) पहाटेच्या सुमारास जेरबंद केले होते.

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली होती. हत्याकांडानंतर 102 दिवस बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. पारनेर न्यायालयांने त्याला फरार घोषित केले होते.

येत्या 9 एप्रिलपर्यंत बोठे स्वतःहून हजर न झाल्यास त्याच्या संपत्तीवर टाच आणण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला होता. नगरच्या पोलीस पथकाने शनिवारी पहाटे हैदराबाद येथून बोठे यास ताब्यात घेतल्यानंतर सुपा पोलीस स्टेशनमध्ये अटकेचे सोपस्कर पुर्ण करण्यात आले.

रविवारी त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी बोठेचे वकील व सरकारी वकील यांच्यात झालेल्या युक्तिवादानंतर पारनेर न्यायालयाच्या न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांनी बाळ बोठेला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe