अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- रविवारी चिंता वाढवणारे दोन आकडे समोर आले. संसर्गाचा दर गेल्या वर्षाच्या डिसेंबरच्या स्तरावर (१.८५%) पोहोचला आहे. तो काही दिवसांपासून १.५५% च्या जवळपास होता.
म्हणजे गेल्या २४ तासांत कोरोनाच्या रुग्णालयात असलेल्या सक्रिय रुग्णांचा आकडा २.१० लाखांवर गेला आहे. १९ जानेवारीनंतरचा (१.८२%) हा सर्वात मोठा आकडा आहे.
हे मास्क न घालणे आणि सहा फूट अंतराच्या नियमांचे पालन न करण्याचे परिणाम आहेत, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचे ६७% रुग्ण महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांतील आहेत.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत १६,६२० तर पंजाबमध्ये १,५१५ नवे रुग्ण आढळले. पंजाबमध्ये या वर्षातील एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे. पंजाबचे नोडल अधिकारी डॉ. राजेश भास्कर यांनी सांगितले की, राज्यात एवढे रुग्ण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आढळत होते. कोरोनाचा संसर्ग वाढवण्यात महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबचा वाटा ७६.९३% आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|