अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याच पार्श्वभूमीवर आपल्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलाविली होती.
दिल्लीत लॉकडाऊन केले जाणार नाही, असे संकेत या बैठकीतनंतर अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना लॉकडाऊन लावावा की कठोर निर्बंध लादावेत, याविषयी चर्चा सुरू झाली.
मात्र, दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये करोनाची चौथी लाट येऊन देखील, लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.
दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण वाढल्यामुळे चिंता वाढू लागली होती.
तसेच, पुन्हा लॉकडाऊन लागू केला जातोय की काय, अशी भिती देखील दिल्लीकरांना वाटू लागली होती. मात्र, दिल्लीत लॉकडाऊन लागू करणार नाही,
असं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे. पुन्हा लॉकडाऊन जरी लागू केला जात नसला, तरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना कळकळीचं आवाहन केलं आहे.
“माझं दिल्लीकरांना हात जोडून आवाहन आहे की कृपया त्यांनी मास्क घालावेत”, असं केजरीवाल म्हणाले आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|