काय सांगता : अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले चक्क वाळूतस्कर!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- आज मितीला वाळू तस्करांचे दिवसेंदिवस वाढत चाललेले वर्चस्व कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. आता तर वाळू तस्करांची मजल अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर जाऊन बसण्यापर्यंत पोहोचली आहे.

याबाबत सविस्तर असे की,  श्रीगोंदा तहसील कार्यालयातील कुळकायदा विभागाचे अव्वल कारकून आपल्या घरगुती कामानिमित्त रजेवर असल्याने त्यांच्या कामाची धुरा एका खाजगी व्क्तीच्या हातात देण्यात आली होती.

त्याच वेळी श्रीगोंदा तालुक्यातील बोरी येथील एक वाळू तस्कर आपल्या मित्रासह तहसील कार्यालयात येऊन कुळकायदा शाखेतील चक्क अव्वल कारकून यांच्या खुर्चीवर बसले.

दरम्यान त्याच कालावधीत तालुक्यातील काही पत्रकार त्या ठिकाणी दाखल झाले त्यावेळी त्यांनी त्यांची विचारणा केली असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींना उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या, सदर इसमाबाबत अधिक चौकशी केली असता ते अव्वल कारकून यांचे पाहुणे असल्याचे समजले.

आता वाळू तस्करांची मजल अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर जाऊन बसण्यापर्यंत पोहोचली असल्याने वाळू तस्कर आणि तहसील यांचे सलोख्याचे संबंध चव्हाट्यावर आल्याने तहसील कार्यालयात एकच चर्चेला उधाण आले असून याप्रकरणात तहसीलदार प्रदिप पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe