अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news :- भारत एक कृषिप्रधान देश आहे, मात्र असे असले तरी अनेक शेतकरी पुत्र शेतीपासून दुरावत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सुलतानी दडपशाहीमुळे अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.
असे असले तरी, शेतीतून अधिक उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते मात्र यासाठी शेतकरी बांधवांना आधुनिकतेची कास धरावी लागेल आणि विशेष म्हणजे पीक पद्धतीत मोठा बदल करावा लागेल.
कृषी वैज्ञानिक देखील नेहमीच शेतकरी बांधवांना पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला देतात. देशात असे अनेक शेतकरी आहेत त्यांनी पारंपरिक पिकाला बगल देत नवीन नगदी असेच कायम मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड करून चांगला बक्कळ पैसा छापला आहे.
आज आपण अशाच एका सदैव मागणी मध्ये असलेल्या पिकाच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो आज आपण मेहंदीच्या शेती (Mehndi farming) विषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पानांसाठी मेंहदीची लागवड (Henna Farming) केली जाते.
त्यात ‘लेसन’ नावाचे पिगमेंट कंपाऊंड असते. ज्याचा वापर केस आणि शरीराला रंग देण्यासाठी केला जातो. शुभ प्रसंगी मेंदीची पाने बारीक करून हात-पायांवर लावतात. मेंदीच्या पानांचा वापर पांढरे केस रंगवण्यासाठीही केला जातो. डोक्यावर वापरल्याने कोंड्याची समस्याही दूर होते. त्वचेच्या आजारांवरही याची पाने उपयुक्त आहेत.
मित्रांनो मेहंदीची शेती ही संपूर्ण भारतात (Indian Farming) केली जाते मात्र, राजस्थान राज्यात (Rajasthan) याची सर्वात जास्त शेती बघायला मिळते. राजस्थान मधील पाली जिल्हा मेंदीच्या शेतीसाठी संपूर्ण देशात विख्यात आहे. या जिल्ह्यात जवळपास 40 हजार हेक्टर क्षेत्रावर मेहंदीची शेती केली जाते. या जिल्ह्यात मेहंदीचे उत्पादन तयार करण्यासाठी अनेक कारखाने आपल्याला नजरेस पडतील.
पावसाळ्यात बांध तयार करून शेती समतोल करावी. यानंतर चकती व कल्टिव्हेटरने नांगरणी करून जमीन भुसभुशीत करावी. नांगरणीनंतर 10-15 टन कुजलेले शेणखत टाकावे जेणेकरून या पासून चांगले उत्पादन मिळवता येईल. मेहंदी कोणत्याही हवामानात पिकवता येणे शक्य आहे. असे असले तरी याची झाडे कोरड्या ते उष्णकटिबंधीय आणि मध्यम उष्ण हवामानात चांगली वाढत असतात असे तज्ञांचे म्हणणे आहे.
तुम्ही मेहंदीची रोपे तयार करू शकता किंवा त्याची रोपे नर्सरीमधून विकत घेऊ शकता नर्सरीमध्ये देखील याची रोपे सहज मिळतात. एक हेक्टर जमिनीवर रोपे लावण्यासाठी जर रोपे तयार करायचे असतील तर सुमारे 6 किलो बियाणे पुरेसे आहे. बेड चांगले तयार करून मार्च महिन्यात रोप निर्मितीसाठी पेरणी करावी.
मेहंदीची रोपे एका वर्षात लागवडीयोग्य बनत असतात. या पिकाला एप्रिलमध्ये फ्लॉवरिंग येतं असते. एकदा स्थापित झाल्यानंतर, याचे झुडूप 20 ते 25 वर्षे उत्पादन देण्यास सक्षम असते. मेहंदी पिकासमवेतच आपण या पिकात आंतरपीक म्हणून इतर पिकांची लागवड करू शकतात.