अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील रस्त्याच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना मा. आ. विजय औटी यांनी या कामात कोणी खो घातला तर मी सर्वांचा बाप आहे हे सिद्ध करून दाखवेल, तुम्ही वरातीमध्ये नाचायला निवडूण आलात का अशी बोचरी टिका आमदार नीलेश लंके यांच्यावर केली होती.
ही बातमी सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर आ. लंके समर्थकांनी सोशल मिडियावर मा. आ. औटी यांच्यावर टिकेची झोड उठविली आहे.
लंके समर्थक व्हायरल करीत असलेली पोष्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे :
मी सगळयांचा बाप आहे…
खर आहे साहेब वयाने आणि अनुभवाने तुम्ही सगळयांचे बाप आहात ,,, पण तुमच्यातला हा बाप कोरोनाच्या दोन्ही संकटात कोठे गेलता हो,,,, तालुक्याची जनतेचे हाल होत होते कोरोना काळात त्या वेळेस कोठे होता हो साहेब तुमच्या मधला बाप….
त्या कोरोनाच्या संकटात तर बिळात बसलात,, साहेब स्वतःला बाप म्हणुन घ्यायला खऱ्या अर्थाने बाप पन सिद्ध कराव लागत,,, काही न करता आजकालची शेबंडी मुलपण म्हणतात की मी बाप आहे सगळयांचा,,,,,,
ज्याच्यावर टीका करताय तुम्ही त्यांनी तालुक्यातल्याच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला संभाळलय,,,,
नुसत वय झाल असण केस पांढरे झाले की सगळ्यांचा बाप नाही हो होत येत,,, त्यासाठी तस कर्तुत्व लागत..😃
हयात असेपर्यंत विकासाच शब्द पाळणार
साहेब १५ वर्ष प्रतिनिधी असतानी कीती शब्द पाळले तुम्ही,,,, आता काय पाळणार???
तुम्ही मस्त शेती करताय तीच करा सध्या,,, विकास आणि विकासाची शब्द पाळण्यास आमदार लंके साहेब खंबीर आहेत,,,, आपन १५ वर्षात जे केल नाही ते काम २ वर्षाच्या आत मार्गी लागलेत त्यात दीड वर्ष कोरोना आहे,,, आमदार असताना नाही विकास झाला आता कोठून विकास करणार हो साहेब,,,
उगवत्या सुर्याला दंडवत कसणारे वाढले
म्हणजे मान्य केल तूम्ही समोरचा माणुस सुर्य आहे,,, साहेब खर आहे लंके साहेब म्हणजे तो सूर्य आहे ज्याचा प्रकाश संपूर्ण देशात प्रखरतेने पडलाय,,,,
आणि जो कामाचा माणुस आहे, जो माणूस २४ तास गोरगरीबांसाठी धावतो त्याला नमस्कार तर होणारच साहेब,,
साहेब फक्त नमस्कार नाही होत तर पाय धुतले जातात देवाप्रमाणे…
तरूण पिढाला जोडा
काय जोक करता राव साहेब,, खरच खुप हसवता राव कधी कधी तुम्ही,,,, अहो साहेब सगळी तरूणाई एकवटली तुमच्या विरूध्द म्हणुन तर ह्यावेळस लिड ६१ हजार झाल,,,, ह्या वेळेस सगळे ग्रामपंचायत निकाल पहा सगळे नविन चेहरे आहेत,,, सगळया कमिट्या पहा त्यात नविन चेहरे आहेत,,, आणि येणाऱ्या नगरपंचायत, झेडपी व पंचायत समितीला पण तरूणच असतील,,
लंके साहेबांमुळे तालुक्यातले नाही संबध महाराष्ट्रातले तरुण राजकारणात यायला लागले..
वरातीत नाचायला निवडून आलात का?
साहेब एखादया गरीबाच्या वरातीत जाऊन आल तर त्या कुटुंबाचा आनंद नाही हो मोजता येणार तुम्हाला,,,, आणि बाप म्हणुन नाचाव पण लागत वरातीत…. १५ वर्ष नाही तुम्हाला काही जमल आणि दीड वर्षात दुसऱ्यांना शहाणपण लागले शिकावायला,,,
साहेब २४ तास पळतोय समोरचा माणूस जनतेसाठी,, दूपारी ३ते ५ झोप आणि रात्री ८ नंतर स्वीच आँफ. अस नाही त्यांच शेड्यूल…
तालुक्याची जनता सुज्ञ आहे त्यामुळे तूम्ही सध्या तब्येतीची काळजी घ्या…
मी आता उमेदवार नाही
साहेब तुम्ही उमेदवार नाही हे तुम्ही कशाला सांगायला हव,,,, ते कधीच समजलय जनतेला,,,
जोपर्यत लंके साहेब आहेत तोपर्यंत समोर उमेदवार नसेल,,,, लंके साहेबांची बरोबरी करायला त्यांच्याएवढ काम नाही करू शकत कोणी .,,,,,
तुम्ही तुमची रीटायरमेंट मस्त इंजाँय करा,, मस्त शेतीमध्ये मन रमवा,, तालुक्याची काळजी वाहयला लंके साहेब सर्मथ आहेत…. आणि निधी आणायला पण,,, निधी कोणी व कसा आणला ह्याच उत्तर लवकरच कळेल जनतेला,,, नुसत्या पाट्या लावुन उद्द्घाटन करण्याचे दीवस गेले..
पारनेर तालुका सेनापती बापटाचा सुसंस्कृत पुरोगामी विचारानचा तालुका आहे ,
दुसऱ्याच्या बापाला आमचा बाप म्हणायची संस्कृती आमची नाही
संकट काळात कुटुंबाच्या मदतीला धावतो तो खरा कुटुंब प्रमुख असतो , तो खरा त्या कुटुंबाचा बाप असतो
तालुक्याच्या सुज्ञ जनतेने आ. निलेश लंके नावाचा कुटुंब प्रमुख निवडला आहे आणि तो महाराष्ट्राने नाही तर महाराष्ट्र बाहेरील जनतेने मान्य केल आहे
म्हणुन त्यांना
उगवता सुर्य म्हणतात ,
आणि सुर्याला आपल्या कडे देव मानतात हो , कि हे हि विसरलात आपण
*सुर्याला देव मानतात म्हणुन आज पारनेरची सुज्ञ जनता
देव माणुस निलेश लंकेसाहेबाना नमस्कार करते
नतमस्तक होते
कोव्हीड सारखे महाभयानक संकटाला कुंटुब प्रमुख म्हणुन राञन दिवस ज्याने काम केले, म्हणुन देवदुत समजुन हिच् जनता देव माणसाचे पाय धुते हि महाराष्ट्राची संस्कृती आहे
तरुणाचे कुटुंबातील सदस्य , नातेवाईक कोरोनाच्या काळात बेड मिळत नव्हते , संकटात होते , त्या वेळी त्या तरूणाच्या मदतीला धावला देव माणुस आ. लंकेसाहेब , रात्रन दिवस तरुणाच्या हाकेला धावला हाच देव माणुस
तेव्हा तुम्ही कुठ होता वो साहेब
म्हातारी म्हणे म्हातार्याला असेच झोपेत काय बडबडता…. एवढ्या मतांनी पडून सुद्धा अजून काय धडपडता…. बाप बाप म्हणून मधेच काय ओरडता…. म्हातारा म्हणे म्हातारीला अगं वेडे असं कुठे असतं का जुनं झालं कुकर मग शिट्टी मारायच सोडतं का😛😀
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम