अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे.
मात्र राज्यात अनेक ठीकाणी आजही निर्बंध कायम आहेत. मुंबईतील लोकल कधी सुरू होणार, तसेच राज्यात अनलॉक कधी होणार, अशा अनेक मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे.

दरम्यान दिसालादायक म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे राजेश टोपे म्हणाले. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, तिसरी लाट येऊ शकते पण ते कधी येईल, हे आपल्यावर आहे.
जर आपण करोनाचे नियम व्यवस्थित पाळले तर आपल्याला करोनाची तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. तसेच यावर लसीकरण सुद्धा रामबाण उपाय असल्याचे टोपे म्हणाले. राजेश टोपे म्हणाले, “ICMR ने पहिला रुग्ण आढळल्यापासून काही नियम आखून दिले आहेत.
त्या नियमानुसारच महाराष्ट्र काम करत आहे. ICMR ने सिरो सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला सांगावे, प्रोटोकॉल द्यावा. कशाप्रकारे निर्बंधामध्ये सुट देता येईल, या संदर्भात सुचना द्याव्यात.
कारण आताच केंद्राची टिम येऊन गेली त्यांनी निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सुचना दिल्या आहेत. आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नियम पाळत आहोत. ICMR ने मार्गदर्शन केल्यास आम्हाला निर्णय घेता
येईल तसेचं महिने दोन महिन्यात राज्याचे लसीकरण १०० टक्के पुर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण त्या गतीनं लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी.
जर ६० ते ७० टक्के लसीकरण झाले. तर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ती या महामारीमध्ये गरजेची असल्याचे टोपे म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













