सर्वांना मोफत लस या घोषणेचे काय झाले?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-राज्यात १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची आणि लागणाऱ्या लसी विकत घेण्यासाठी चेकही तयार असल्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली.

त्याबरोबरच खाजगी रुग्णालयात पैसे भरून लस दिली जाईल, असेही घोषित केले. मग सरसकट सर्वाना मोफत लसीबाबत केलेल्या घोषणेला काय अर्थ आहे, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

सरकारने मोफत लसींची घोषणा केली असली तरी योग्य नियोजन नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, व्याधीग्रस्त नागरिक केंद्रांसमोर तासनतास रांगेत उभे राहिल्याचे आपण पहात आहोत. अनेकांना लसीकरणाशिवाय परत जावे लागत आहे,

कडक उन्हाळा असताना सरकारने मंडप वगैरेची व्यवस्थाही केलेली नाही. त्यामुळे लसीकरण केंद्राबाहेर पाणी, मंडप, स्वच्छतागृह आणि इतर सर्व सुविधा सरकारने तातडीने पूरव्यात, अशी मागणी दरेकर यांनी केली.

लसीच्या उपलब्धतेबाबत केंद्र सरकारवर होणाऱ्या आरोपांबाबत दरेकरांनी स्पष्ट केले की, राज्यसरकारकडून केंद्र सरकारकडे बोट दाखवले जाते. परंतु, केंद्र सरकारशी समन्वय साधून, लसी उपलब्ध करून घेऊन गतीने लसीकरण होणं अपेक्षित होत.

परंतु, आपली निष्क्रियता झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री केंद्रावर ढकलण्याचे काम करीत आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात ३५ लाख जादा लसी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळाल्या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe