अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळण्यासाठी नागरिकांच्या मेडिकल बाहेर रांगा लागल्या आहेत. हे इंजेक्शन मिळत नाही.
मात्र गुजरातमधील सुरत येथील भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत आहे, हे राजकारण नाही तर काय आहे?
असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मंत्री मलिक यांनी ट्विट करुन भाजपाच्या गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत वाटपाच्या मुद्द्यावर टीका करत प्रश्न उपस्थित केला आहे.
रेमडेसिवीर या इंजेक्शनवरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ उडाला आहे. कारण एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येणारे रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुडवडा जाणवत आहे.
ही अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप ही स्थिती सुधारलेली नाही.
रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी धावाधाव करत असल्याचं चित्र आहे.
अशातच नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप करत नवा वाद निर्माण केला आहे. यावर भाजपकडून काय स्पष्टीकरण देण्यात येतं, हे पाहावं लागेल.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|