अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) संघर्षाची संपूर्ण जगाला कल्पना आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हे आज बॉलिवूड (bollywood) इंडस्ट्रीतील एक मोठे नाव असून नवाजकडे आज हजारो चित्रपटांची ओढ आहे आणि या नवीन वर्षात नवाज जवळपास पाच चित्रपटांमध्ये नवाजुद्दीन दिसणार आहे.
NSD सोडल्यानंतर नवाजला यश मिळवायला १५ वर्षांहून अधिक काळ लागला आहे. काही चित्रपटांतून छोट्या-छोट्या भूमिकांमधून करिअरची सुरुवात करणा-या नवाज आज एक मोठा हिरो म्हणून बॉलीवूड मध्ये कार्यरत आहे.

अभिनेता नसता तर नवाज ऋषी-संत (sage-saint) झाला असता नवाजच्या अभिनयाच्या आवडीनं त्याची हिंमत कधीच तडा जाऊ दिली नाही. मात्र,एका वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये जेव्हा नवाजला विचारण्यात आले की, तो अभिनेता नसता तर काय झाले असते, या प्रश्नावर नवाजने आश्चर्यचकित करणारे उत्तर दिले आहे.
नवाजने सांगितले की, जर तो अभिनेता नसता तर संन्यासी झाला असता. त्याच हे उत्तर ऐकून सगळेच अवाक झालेत. यावेळी नवाज म्हणाला, मी जर अभिनेता नसतो, तर साधू (ऋषी-संत) झालो असतो. तुमचा विश्वास बसणार नाही, मी पण प्रयत्न केला आहे.
मी धर्मशाळेतही गेलो, १५ दिवस तिथे राहिलो आणि त्यात सामील झालो होतो. ग्रॅज्युएशनपासून मला साधू बनण्याची इच्छा होती, पण ते होऊ शकले नाही आणि मग मी अभिनेता बनलो मला माहित नाही, दहावीपासूनच माझ्या मनात ही गोष्ट आहे की, मी डोंगरावर जाऊन ऋषी-संत होणार आहेअसं देखील तो यावेळी म्हणाला आहे.
ज्या दिवशी मला अभिनयाचा कंटाळा येईल, त्या दिवशी मी निघून जाईन नवाज म्हणतो, जोपर्यंत मी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा करत आहे आणि लोकांना अस्वस्थ करत आहे, तोपर्यंत अभिनय ही माझी आवड असेल.
तीच व्यक्तिरेखा साकारायला लागलो तर मला कंटाळा येईल आणि मग मी पक्का संन्यासी होईन. मला माझाच विश्वास नाही, कि मी कधी ही हे क्षेत्र सोडून जाऊ शकतो. असं म्हणत त्यांनी अगदी सणसणीत उत्तर देऊन सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम