२२ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शहराची ओळख ही दोन वेशीच्या आतली होती.गेल्या दहा-बारा वर्षापासून शहराचा विस्तार कसा वाढवता येईल,याकडे नियोजन करीत लक्ष दिले.
नागरिकांना विकासाच्या मूलभूत सुविधांपासूनची सर्व कामे मार्गी लावली,त्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत शहराच्या चारही बाजूला नवीन उपनगरे तयार झाली,बुरुडगाव रोड परिसराची विकसित व सुरक्षित उपनगर म्हणून ओळख निर्माण झाली.

त्यामुळे शहरातील नागरिक या भागामध्ये राहण्यासाठी पसंती देत आहे.शहरातील काही स्वयंघोषित पुढारी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहत असतात मात्र आम्ही विकासात्मक कामातून सेवा म्हणून पाहत आहोत,
शहराचे वैभव कसे वाढेल यासाठी सर्व विषयावर काम करत आहोत.आता महापालिकेच्या निवडणुका येतील,त्यावेळी विरोधक विकासाच्या गप्पा मारतील मात्र निवडणुका संपल्या की गायब होतील.
माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी बुरुडगाव परिसराच्या विकास कामांसाठी पाठपुरावा केल्यामुळेच या परिसराला वैभव प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
बुरुडगाव रोड स्वाती कॉलनी येथे माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या पाठपुराव्यातून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला,
यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, बाळासाहेब वाघ, संजय भंडारे,पत्रकार शिल्पा रसाळ, निखिल रसाळ, माया धोका आधीच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप बालपणी चाणक्य चौकात राहत होते, त्यावेळी ते स्वाती कॉलनीमध्ये खेळण्यासाठी यायचे असते.शहराचे तिसऱ्यांदा आमदार झाले,याचे कौतुक आहे.त्यांच्या हातून नगर शहराचा विकास कामातून कायापालट होत असल्याचे मत ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब वाघ यांनी व्यक्त केले.