अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अकोले तालुक्यात रविवारी (१८ एप्रिल २०२१) झालेल्या कोरोना आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने चांगलाच गोंधळ घातल्याची घटना बघायला मिळाली.
बैठकीत मंत्री बाळासाहेब थोरात नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत असताना राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याने मोठ्या आवाजात प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून बैठकीत आक्रमक रूप धारण करत चांगलाच गोंधळ घातला.
कोरोनाआढावा बैठकीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाने रेमडेसीवीर इंजेक्शनसंदर्भात प्रश्नांची सरबत्ती केली.
अकोले तालुक्याची कोरोनामुळे बिकट अवस्था झाली असताना नीट आरोग्य सुविधा पुरवल्या जात नाही’,
असे सांगत आरोग्य विषयक तक्रारीचा पाढाच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवि मालुंजकर यांनी वाचला.
त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. बैठकीतील इतर कार्यकर्त्यांनी मालुंजकर यांना खाली बसण्यास सांगितले.
पण, तरीही मालुंजकर प्रश्न विचारतच होते. विशेष म्हणजे या प्रकाराने संतप्त झालेल्या बाळासाहेब थोरात यांनी देखील या कार्यकर्त्याला चांगलंच झापलं. तुझं जितकं वय आहे तितकं माझं राजकारण आहे.
तुम्हाला संवेदना आहेत आणि आम्हाला नाही आहेत का? असा प्रश्नही थोरातांनी त्याला विचारला. आम्ही ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं असं नाही, असंही त्यांनी सुनावलं.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|