कोरोना रुग्णाने रुग्णालयात कधी भरती व्हावं? वाचा महत्वाची माहिती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- देशात सध्या रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे. त्यामुळे जास्त लक्षणं नसलेल्या रुग्णांनी रुग्णालयात भरती न होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

केंद्र सरकारने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे डॉ. सीएस प्रमेश यांचा सल्ला सांगण्यात आला आहे.

व्हिडिओत चांगल्या आहारासोबतच, योग-प्राणायम करणे, कोव्हिड-पॉझिटिव्ह रुग्णांनी ताप आणि ऑक्सिजन पातळी तपासत राहण्याचा सल्ला दिला आहे.

व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, तुमच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा जास्त असल्यास तुम्हाला भरती होण्याची गरज नाही.

आणखी निट माहिती मिळवायची असल्यास, रुग्णाने आपल्या खोलीत 6 मिनिट चालावे त्यानंतर पुन्हा ऑक्सिजन चाचणी करावी.

यानंतर तुमची ऑक्सिजन पातळी कमी जास्त होत असेल तर, तुम्ही रुग्णालयाशी संपर्क करावा.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe