अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन झाले. दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. खा. गांधी यांचे निधन झाल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर येताच अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला असून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.
अहमदनगर लोकसभेचे भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अहमदनगर येथे झालेल्या भाषण करीत असलेल्या गांधी यांना भजपाच्याच नगर जिल्हाध्यक्ष यांनी भाषण मध्येच थांबवण्याच्या सूचना दिल्याने खासदार गांधी यांचे डोळे पाणावले होते.
उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती, यावेळी खासदार दिलीप गांधी भाषण करत असताना, त्यांना मध्येच थांबण्याची सूचना जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी केली त्यामुळे भावनिक झालेल्या गांधींचे डोळे पाणावल्याचे चित्र पहायला मिळाले.
मात्र चिठ्ठी दिल्यामुळे त्यांचा पारा चढला व ते भडकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंचावर येण्यापूर्वी खा दिलीप गांधी भाषण करत होते, त्यांचे भाषण सुरु असतानाच जिल्हाध्यक्ष बेरड यांनी चिट्ठी देत भाषण थांबवण्यास सांगितले, भाषण थांबवण्यास सांगितल्यावर गांधी भडकले, भाषणात विखेंच नाव न घेता मतदारांना मतदान करण्याच आवाहन.
तसेच विद्यमान खासदार असताना देखील बोलून न दिल्याने ते भावनिक झाले होते.परंतु उमेदवार सुजय विखे यांनी मात्र सर तुम्ही बोला असे गांधी यांना सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात दिलीप गांधी यांनी नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास केल्याच सांगितल आहे.
त्यामुळे गांधी यांना काहीसे समाधान वाटले होते. दिलीप गांधी हे संघाच्या मुशीत वाढले होते, त्यामुळे भारतीय जनता पक्षावर त्यांची प्रामाणिक निष्ठा आणि प्रेम होते.
2019 मध्ये दिलीप गांधी यांचे तिकीट कापून भाजपने राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. यावेळी दिलीप गांधी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, तरीही त्यांनी एकनिष्ठ कार्यकर्ता बनून भाजपाचं काम केलं. डॉ. सुजय विखेंच्या विजयासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
- #Former Union Minister Dilip Gandhi dies