भाजपचे हे नेते अहमदनगरमध्ये आल्यावर म्हणाले सरकारच्या तिजोरीच्या किल्ल्या हरवल्या, त्या रात्रीच …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- परप्रांतीय विरोधातील भूमिका मनसे जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी भाजपशी युती शक्य नाही. त्यांनी भूमिका बदलली तर भाजप युती संदर्भात विचार करेल, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे-भाजप युती वर भाष्य केले.

अहमदनगर येथे संघटनेच्या बैठकीसाठी आलेले चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मनसे भाजप युती संदर्भात ते म्हणाले, नाशिक येथे राज ठाकरे यांच्याशी भेट झाली.

मात्र, ते जोपर्यंत परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलत नाही, तोपर्यंत युती होणे अवघड आहे. ठाकरे यांनी हा गैरसमज असल्याचे मला सांगितले. मात्र, तो गैरसमज दूर होत नाही अथवा ते भूमिका बदलत नाही तोपर्यंत युती होणार नाही.

त्यांनी भूमिका बदलली आणि गैरसमज दूर केला तर त्यानंतर भाजपची राज्यातील 11 सदस्यांची कोअर कमिटी निर्णय घेईल, असे ते म्हणाले. भाजप हा देशव्यापी पक्ष आहे. त्यामुळे आमच्या काही अटी आहेत.

त्या पूर्ण करेल त्यांच्याशी युती होईल असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकारच्या तिजोरीच्या किल्ल्या हरवल्या आहेत. त्या फक्त रात्रीच सापडतात. राज्याचे मुख्यमंत्री पूर स्थितीमध्ये मातोश्रीवर बसले आहेत.

त्यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापनाच्या वॉररूम मध्ये जाऊन माहिती घ्यावी, आणि केंद्राच्या मदतीची वाट न पाहता पूरग्रस्तांना मदत करावी, अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe