जम्बो कोविड सेंटर केव्हा सुरू होणार?

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- खासदार सदाशिव लोखंडे यांनी दोन दिवसांपूर्वी शिर्डी शहरात ४२०० बेडचे भव्य जम्बो कोविड सेंटर उभारणार असल्याची घोषणा मनाला समाधान देणारी असली, तरी यासाठी आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ व रुग्णवाहिका याची मोठी कमतरता आहे.

या गोष्टी कधी उपलब्ध होणार? व हे सेंटर केंव्हा उभे राहणार? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी केला आहे.याबाबत पत्रकात कोळगे यांनी सांगितले, की शिर्डी शहरात जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत व १० तालुक्यातील जनतेला फायदा झाला पाहिजे,

याबाबत दुमत नाही; मात्र त्यासाठी लागणारे मनुष्यबळ कुठून आणणार? त्या कामगारांचे पगार कोण करणार? त्यांची भरती कधी होणार? रुग्णवाहिका कधी उपलब्ध होतील? कोविड सेंटर सुरू करण्यासाठी किती कालावधी लागेल? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत.

शासन तिसरी लाट येणार असे सांगत आहे. जनतेत मोठ्या प्रमाणावर घबराट निर्माण झाली असताना कोविड सेंटर कधी उपलब्ध होईल, त्यासाठी किती कालावधी लागेल, डॉक्टरांची टीम उपलब्ध करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत,

गरोदर मातांच्या अडचणीबाबत काय उपाययोजना आहेत, शिर्डी साईबाबा संस्थांकडे पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, खासदार निधीतून किती खर्च केला जाणार आहे, याचादेखील खुलासा करण्याची गरज होती; मात्र तसा खुलासा केलेला नाही.

त्यात रुग्णांच्या भोजनाची व इतर गोष्टींची व्यवस्था यांसह विविध प्रश्न तात्काळ सोडविण्याची गरज आहे. केवळ घोषणा नको, तर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी खासदारकी पणाला लावावी, अशी मागणी कोळगे यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe