अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- मागील काही दिवसांपासून पावसानं अनेक भागांमध्ये दडी मारली आहे. शेतीची कामं जोमानं सुरु असतानाच पावसाचा हा लपंडाव सुरु झाल्यामुळे बळीराजालाही अनेक प्रश्न सतावू लागले. पण, आता ही चिंता मिटणार आहे.
हवामान खात्यानं शेतकऱ्यांसाठी दिलासादायक माहिती दिली असून, पुढच्या 4-5 दिवसांमध्ये पावसाच पुनरागमन होण्याच अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलीय.
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयानं महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जाहीर केलाय. पावसानं विश्रांती घेतल्यानं सध्या उकाडा वाढलाय, नागरिक त्रस्त आहेत. तर पावसाचं प्रमाण कमी असलेल्या भागात शेतकऱ्यांसमोर पीक जगवण्याचं आव्हान उभं राहिलंय.
राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होतं आहे. विदर्भात सर्वत्र हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अ
कोला अशा एकूण 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. कालही याच भागात हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला होता. आजही याठिकाणी हीच स्थिती कायम आहे.
संबंधित अकरा जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. आज संबंधित जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आकशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम