अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर मंगळवारी रात्री गोळीबार झाला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झालेले असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हा गोळीबार वाळूच्या वादातून झाला की राजकीय वैमनश्यातून या विषयी तालुक्यात तर्कवितर्क लढविले जात आहे. संकेत चव्हाण हे कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूर रस्त्याने रात्री साडेनऊच्या दरम्यान आपल्या घरी येत असताना एका ठिकाणी लघुशंकेसाठी थांबले होते.
त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या इसमांनी गावठी कट्टयातून संकेत यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. या गोळीबारातील जखमी व गोळीबार करणारे मित्र असून त्यांच्यातील वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
हा गोळीबार वाळूच्या वादातून झालेला आहे की राजकीय पूर्व वैमन्यशातून याविषयी बर्हाणपूरसह तालुक्यात तर्कवितर्क लढविले जात आहे. या गोळीबाराच्या घटनेची माहिती समजताच शेवगाव उपविभागीय अधिकारी सुर्दशन मुंढे ,
शिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल तातडीने घटनास्थळी हजर झाले आहे. बर्हाणपूर परिसरात मोठा फौजफाटा दाखल झालेला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केलेला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम