Vivo V27 Pro Vs Oneplus 11R : कमी बजेटमध्ये कोणता स्मार्टफोन आहे तुमच्यासाठी खास, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Published on -

Vivo V27 Pro Vs Oneplus 11R : सध्याच्या काळात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक दिग्ग्ज टेक कंपन्या त्यांचे स्मार्टफोन लाँच करत आहेत. मागणी आणि गरज लक्षात घेता या सर्वच स्मार्टफोनच्या किमती खूप जास्त आहेत.

भारतीय बाजारात Vivo आणि Oneplus या दोन आघाडीच्या टेक कंपन्या आहेत. Vivo V27 Pro आणि Oneplus 11R हे दोन खूप लॉकप्रिय स्मार्टफोन आहे. अशातच अनेकांना या दोन स्मार्टफोनपैकी कोणता स्मार्टफोन विकत घ्यावा असा प्रश्न पडतो. जर तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल जर बातमी शेवटपर्यंत वाचा.

जाणून घ्या Vivo V27 Pro Vs Oneplus 11R ची किंमत

Vivo V27 Pro मॅजिक ब्लू आणि नोबल ब्लॅक कलर पर्यायांमध्ये कंपनीने सादर लेला आहे. स्टोरेजचा विचार केलेला तर या फोनच्या 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 37,999 रुपये आणि 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजची किंमत 39,999 रुपये इतकी आहे. तसेच फोनच्या 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 42,999 रुपये इतकी आहे.

कंपनीचा Oneplus 11R हा स्मार्टफोन सोनिक ब्लॅक आणि गॅलेक्टिक सिल्व्हर कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. फोन दोन स्टोरेज असून 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर 16 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजची किंमत 44,999 रुपये इतकी आहे.

असा असणार डिस्प्ले आणि स्पेसिफिकेशन

कंपनीचा Vivo V27 Pro या फोनमध्ये 6.78-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED वक्र डिस्प्ले असून ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आणि पिक्सेल रिझोल्यूशन 2400x 1080 आहे. फोनमध्ये 4 nm MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर असून 12 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.

Oneplus 11R मध्ये 6.74-इंचाचा फुल एचडी प्लस वक्र AMOLED डिस्प्ले दिला असून ज्याचे रिझोल्यूशन 2772×1240 पिक्सेल आहे तर 1450 nits चे पीक ब्राइटनेस आहे. डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेट आणि 1440 Hz उच्च वारंवारता PWM dimming आणि 100 टक्के DCI P3 कलर गॅमट द्वारे समर्थित आहे. कंपनीने यात Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि 256 GB पर्यंत स्टोरेज LPDDR5X रॅमसह 16 GB पर्यंत मिळते. तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.

असा असणार कॅमेरा

कंपनीच्या Vivo V27 Pro या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिल आहे, ज्याचे प्राथमिक लेन्स ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 50-मेगापिक्सेल Sony IMX766V सेन्सर आहे. तर या फोनची दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगलची असून तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 50-मेगापिक्सेल ऑटोफोकस कॅमेरा उपलब्ध आहे.

Oneplus 11R मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा Sony IMX890 सेन्सरसह येतो. दुय्यम कॅमेरा 8-मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड-एंगल सेन्सर तर तिसरा कॅमेरा 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. Oneplus 11R मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16-मेगापिक्सलचा पंच होल फ्रंट कॅमेरा आहे.

इतकी असणार बॅटरी लाइफ

Vivo V27 Pro मध्ये कंपनीने 4600mAh बॅटरी दिली आहे, ज्यात 66W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. या फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट उपलब्ध आहे.
Oneplus 11R मध्ये कंपनीने 5000mAh बॅटरी पॅक केली आहे, ज्यात 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्टही उपलब्ध आहे.

वनप्लसचा प्रोसेसर आणि कामगिरीच्या बाबतीत Oneplus 11R Vivo V27 Pro पेक्षा खूप पुढे आहे. तर विवोचा Vivo V27 Pro फोटोग्राफी आणि सेल्फीच्या बाबतीत खूप पुढे आहे. बॅटरी आणि फास्ट चार्जिंगच्या बाबतीतही OnePlus पुढे आहे. तुम्‍ही तुमच्‍या पसंतीनुसार फोन ऑप्शनमध्ये ठेवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe