अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- देशात कोविशील्ड, कोव्हॅक्सिन व स्पुटनिक-व्ही या लसींना मंजुरी मिळालेली अाहे. तिन्ही लसी सुरक्षित व उपयोगी असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. दरम्यान, एका अध्ययनानुसार, विषाणूविरुद्ध अँटिबॉडी निर्माण करण्यात कोविशील्ड कोव्हॅक्सिनपेक्षा जास्त प्रभावी आहे.
दोन्ही डोस घेणाऱ्या ५२२ आरोग्य कर्मचाऱ्यांवर हे अध्ययन करण्यात आले. त्यात ३२५ पुरुष आणि २७७ महिला होत्या.या संशोधनाचे नाव कोरोना व्हायरस व्हॅक्सिन इन्ड्युस्ड अँटिबॉडी टायटर (कोव्हॅट) असे आहे. काेणती लस किती प्रभावी आहे, असा त्याचा उद्देश होता.
अध्ययनात समोर आले की, कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर शरीरात कोव्हॅक्सिनच्या तुलनेत अँटिबॉडीची पातळी जास्त असते. तथापि, तो क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये समाविष्ट करण्यात आला नाही.
४५६ लोकांना कोविशील्ड तर ९६ जणांना कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली होती. कोविशील्ड घेणाऱ्यांत ९८.१% तर कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांत ८०% सीरोपॉझिटिव्हिटी दिसली आहे. तथापि, दोन्हीही लसींनी रोगप्रतिकार क्षमता चांगली वाढवली.
मात्र सीरोपॉझिटिव्हिटी रेट आणि मीडियन अँटी-स्पाइक अँटिबॉडी कोविशील्डमध्ये जास्त आढळली. म्हणजे कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशील्ड जास्त अँटिबॉडी तयार करते. अद्याप या अध्ययनाचा आढावा घेण्यात आलेला नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम