अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. यातच महिला अत्याचार, विनयभंगाच्या घटनांची दररोज नोंदी होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
यामुळे समाजात महिलांची सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. नुकतेच अशीच एक घटना राहाता मध्ये घडलेली दिसून आली आहे.
राहाता गावातील तरुणाने पती घरात नसताना स्वयंपाक घरात येऊन महिलेचा हात धरला व विनयभंग करत महिलेला मारहाण केली. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात एका जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणतांबा येथे 2 जुलै रोजी पीडित महिला स्वयंपाक करत होती. त्यादरम्यान तिचे पती औषधे आणण्यासाठी पुणतांबा गावात गेले असताना त्याचवेळी दयानंद गोविंद काळे हा अचानक घरामध्ये आला.
त्यावेळी त्याच्या हातात गजाचा तुकडा होता. त्याने घरात आल्यावर महिलेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व त्याच्या हातातील गजाच्या तुकड्याने महिलेच्या डोक्याचे पाठीमागील बाजूस मारहाण करून पलायन केले.
पती आल्यानंतर पीडित महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी दयानंद गोविंद काळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम