वाळूची तस्करी सुसाट सुरु असताना शासकीय घरकुले मात्र वाळूअभावी रखडली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- जिल्हा कोणताही असो पैसे उत्पनाचे स्रोत म्हणून वाळू तस्करी करणारे अनेकजण आतापण पहिले असतील. महसूलच्या नाकावर टिच्चून हे तस्कर वाळू उपसा करतात व आपला व्यवसाय सुरु ठेवतात.

मात्र दुसरीकडे वंचितांसाठी राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजना वाळूअभावी रखडली असल्याचे चित्र नेवासा तालुक्यात दिसून येत आहे. नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे मुळा व प्रवरा या दोन नद्यांचा संगम असल्याने बहुमूल्य वाळू आहे.

या वाळूवर तालुक्यातील व बाहेरील वाळूतस्कर डोळे लावून बसले आहेत.पण गावातील घरकुलांसाठी वाळू मिळेनाशी झाल्याने गावातील घरकुले वाळू वाचून थांबली आहेत. आजही गावातील वाळूची तस्करी जोमाने होत आहे.

घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी काही ग्रामस्थ तर वाळू मोटारसायकल वर वाहून नेत आहेत. ग्रामस्थांपुढे दुसरा मार्ग नसल्याकारणाने हा मार्ग अवलंबून आपले घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.

गावात जवळपास 71 घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी 46 पूर्ण झाली असून उर्वरित 25 घरकुले वाळूवाचून थांबली आहेत. वाळू तस्कर वाळूवर डल्ला मारत आहेत.

मात्र हे सामाजिक कार्यकर्ते या वाळू तस्करांना रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपायोजना करताना दिसत नाहीत. मात्र गावात घरकुलासाठी लागणारी वाळू थांबवून व वाळू वाचून घरकुलाचे काम थांबविण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न करताना दिसत आहे.

गावात भरमसाठ वाळू आहे,मात्र गावातील ग्रामस्थांच्या घरकुलासाठी नाही, तर वाळू तस्करांसाठी आहे, असे ग्रामस्थ बोलताना दिसत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe