लस देता का लस.. खासदारांकडे मागणी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सध्या झपाटयाने वाढायला लागली आहे.

कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर हाल झाली आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील व ग्रामीण भागातील बाजारपेठा बंद राहिल्या मुळे मोठे नुकसान झाले आहे.पुन्हा तिसरी लाट आली तर सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल होणार आहे.

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे असताना नागरिकांना लस उपलब्ध होत नाही.लसीकरण होण्याकामी आपण लोकप्रतिनिधी या नात्याने जातीने लक्ष घालून लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य अशोकराव चव्हाण ,अ.भा.छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख नितिन पटारे,जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे,जिल्हा संपर्क प्रमुख किशोर शिकारे, विद्यार्थी आ. जिल्हा प्रमुख सचिन खंडागळे,नगर तालुका प्रमुख फटांगरे किरण,कामगार आघाडी नेते रावसाहेब काळेजिल्हा उपाध्यक्ष अतुल जुंबड,

गणेश गायकवाड, प्रशांत गायकवाड, अनिल ननावरे, दीपक चांदणे,बहिरनाथ गोरे, दत्ता वामन, आढाव गोरख, अमोल वाळुंज, गणेश शिंदे, उमेश नवघरे, जाधव रवी, जाधव विशाल, अनुभव भोसले,सिद्धेश घनवट, नारायण काळे, कापसे जालिंदर आदी उपस्थित होते. आभार किशोर शिकारे यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe